रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

भुताबरोबर प्रणय केल्याचा पॉप स्टारचा दावा

WD
अमेरिकन पॉप स्टार किशा हीने आपण चक्क भुताबरोबर प्रणय केल्याचा दावा केला आहे. भुताचा स्पर्श आपल्याला जाणवत होता आणि आपण त्याच्याबरोबर सेक्सी टाईम व्यतित केल्याचे तिने म्हटले आहे.

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार या पॉपस्टारने सांगितले की या अनोख्या अनुभवाची सुरुवात तिच्या घरात ती एकटी असताना अचानक झालेल्या प्रेमळ स्पर्शाने झाली. अमेरिकन टीव्ही होस्ट कॅनन ओ ब्रायनच्या चॅट शोमध्ये तिने हा अनुभव सांगितला. ती म्हणाली, त्या भुताचे नाव, पत्ता किंवा त्याच्याबाबतची कोणतीही माहिती आपल्याला नाही. मात्र हे भूत आपल्या घरातच वावरत होते. यापूर्वीही तिने या अनुभवाचा उल्लेख केला होता. आता तिचा नवा ‍अल्बम 'वॉरियर' प्रसिद्ध होत आहे. त्याला हवा देण्यासाठी तिने पुन्हा ही रेवडी उडवली आहे की काय देव जाणे!