1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

मुलांमुळे घटस्फोट थांबला - लोपेज!

PTI
पॉप स्टार आणि हॉलिवूडची अदाकारा जेनिफर लोपेजने सिंगर मार्क एंथोनीबरोबर आपले दांपत्य जीवन सुरक्षित असल्याचे श्रेय आपल्या मुलांना दिले आहे.

कांटॅक्ट म्युझिकने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ष 2004मध्ये एंथनीशी विवाह केल्यानंतर 41 वर्षीय अभिनेत्रीने हे स्वीकार केले आहे की तिच्या दांपत्य जीवनात बऱ्याच अडचणी आल्या होत्या, पण मुलांमुळे तिने तिसऱ्यांदा घटस्फोट घेण्याचा निर्णय टाळला.

लोपेजने सांगितले की, ‘अडचणीच्या वेळेस मला आणि मार्कला मुलांनी मजबुती दिली. मुलांमुळे आम्हा दोघांना ही गोष्ट लक्षात आली की जगात तान तणावाच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी देखील आहेत.

आमच्या अजूनही भांडण होतात, पण आम्हाला या गोष्टीची पूर्णपणे खात्री आहे की मुलांना आमची गरज आहे म्हणून आम्ही लवकरच आपले वाद विवाद संपुष्टात आणतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा