लिंडसेही होणार फोटोसाठी 'न्यूड'
लिंडसे लोहाननेही आता एका फोटो शूटसाठी न्यूड पोझ देण्याचा निर्णय घेतला आहे. तिची अडचण फक्त इतकी आहे, की तिला पोलिसांच्या परवानगीशिवाय मद्याची मात्रा चेक करणारे लॉकेट काढता येणार नाही.लिंडसे अति मद्यपान करत असल्याने पोलिसांनी मद्याची मात्रा चेक करणारी एक ब्रेसलेट तिच्या हातात बांधले आहे. फोटो शूटसाठी हे ब्रेसलेटही काढण्याची आयोजकांची मागणी आहे.पुढील महिन्यात लॉसेंजेलिसमध्ये लिंडसेचे न्यूड फोटो शूट होणार असून, यापूर्वी तिला पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.