अफलातून नृत्यकौशल्य आणि मदहोश करणार्या आवाजाची देणगी लाभलेली कोलंबियन पॉप स्टार शकिरा आता एका नव्या भूमिकेत आली आहे. शकिरा आता आई झाली असून तिने मंगळवारी स्पेनमधील बार्सिलोनातील एका हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. त्यावेळी तिच्यासोबत तिचा प्रियकर गेरार्ड पिक होता. आपल्या मुलाचे नाव तिने मिलान असे ठेवले आहे.