शकिराला लागलेत आई व्हायचे डोहाळे
ND
NDअर्थात आई होण्यासाठी तिला लग्न करण्याची घाई अजिबात नाही. ३२ वर्षीय या कोलंबियन पॉपस्टारची एंटोनियो डेल ला रूआ या तिच्या मित्राशी नऊ वर्षांची घट्ट मैत्री आहे. पण त्याच्याशी लग्न करण्याची तिची अद्याप तयारी नाही. त्याऐवजी ती आई होण्याला प्राधान्य देतेय.
शकिराला खरं तर १५ वर्षांपूर्वी लग्न करायचं होतं. छानपैकी तो वेडिंग गाऊ घालून, सगळ्या पैपाहुण्यांना बोलावून, प्रत्येकाला छानसे गिफ्ट देऊन तिला लग्न साजरं करायचं होतं. पण आता तो काळ गेलाय नि मीही आता प्रौढ झालेय. त्यामुळे आता हे नको. मूलच हवे आहे, असे ती म्हणतेय.

