काबुलमध्ये स्फोट, तीन ठार
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ आत्मघाती कार बॉम्बच्या स्फोटात तीन जण ठार झाले आहेत. हा स्फोट देशात होणार असलेल्या निवडणुकांना पाच दिवस शिल्लक असताना झाला आहे. घटनास्थळी उच्च सुरक्षा क्षेत्र जाहीर केले असून याच भागात नाटो सैनिकांचे शिबिर आहे.