गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (10:06 IST)

इस्तंबूलच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग 29 जणांच्या मृत्यू

Istanbul Nightclub Fire
इस्तंबूलमधील एका नाईट क्लबला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. ज्यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कुठल्यातरी कटाचा भाग म्हणून ही आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
 
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीतील इस्तंबूल येथील एका नाईट क्लबमध्ये दिवसा नूतनीकरणाचे काम सुरू होते. यावेळी येथे भीषण आग लागली. ज्यामध्ये आतापर्यंत किमान २९ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्तंबूलच्या गव्हर्नर ऑफिसने सांगितले की, इतर आठ जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत. शहराच्या युरोपीय भागातील बेसिकटास जिल्ह्यात ही आग लागली. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा नाईट क्लब तळघरात होता. तुर्कीचे न्यायमंत्री यिलमाझ टुनाक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. पाच जणांवर अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यामध्ये नाईट क्लब व्यवस्थापनातील तीन आणि बांधकामाशी संबंधित एका व्यक्तीचा समावेश आहे.या घटनेप्रकरणी एकूण ५ संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व पैलूंचा बारकाईने तपास सुरू आहे.

Edited By- Priya Dixit