1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. 7 seriously injured in Sri Lankan old age home fire

श्रीलंकेतील वृद्धाश्रमात भीषण आग; ११ वृद्ध व्यक्तींचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

श्रीलंकेत वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून, सात वृद्ध व्यक्ती भाजल्याने जखमी झाल्या आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कोलंबोपासून आग्नेयेला सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर, कलुतारा जिल्ह्यातील अंगुरुवाटोटा येथील मावपिया सेवाना वृद्धाश्रमात आग लागली. परिसरात १० मृतदेह आढळले, तर होराना बेस रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणखी एका वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, एकूण ५१ जणांना वाचवण्यात आले असून, सात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगीचे दृश्य पाहून स्थानिक रहिवासी भयभीत झाले.
 
पोलिसांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेदरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे आग वेगाने पसरली.
 
Edited By- Dhanashri Naik
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
कोकण विधान परिषद निवडणुकीत गोंधळ उडाला; उद्धव ठाकरे यांनी बाळा माने यांना पक्षातून काढले?