शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (12:08 IST)

अमेरिकेत 5 वर्षाच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलाने स्वतःवर झाडली गोळी

अमेरिकेतील धोकादायक गन कल्चरने हजारो लोकांचे प्राण घेतले असून यावेळी 5 वर्षाच्या मुलाने चुकून वडिलांच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली आहे, व त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार सॉल्ट लेक सिटीच्या दक्षिणेकडील एक लहान शहरात 5 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल शोक चालू आहे. या मुलाने चुकून त्याच्या पालकांच्या बेडरूममध्ये सापडलेल्या हँडगनने स्वतःवर गोळी झाडली.
 
या मुलाला गुरुवारी दुपारी त्याच्या घराच्या मागील खोलीत 9 मिमीची हँडगन सापडली व त्याने ती डोक्याला लावली आणि ट्रिगर खेचला. गोळीबार झाला तेव्हा मुलाचे आई-वडील त्याचा एक भाऊ घरातच होते, पण ते त्याच्यासोबत खोलीत नव्हते. गोळीबाराचा आवाज ऐकताच वडिलांनी खोलीत जाऊन सीपीआर सुरू केला, मात्र मुलाचा जागीच मृत्यू झाला.

Edited By- Dhanashri Naik