सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (15:12 IST)

बकिंघम पॅलेसमध्ये ‘जय हो’ ची धून वाजणार

इंग्लंडच्या बकिंघम पॅलेसमध्ये महिनाअखेरीस ‘चेंजिंग ऑफ गार्ड’ समारंभाच्या दरम्यान ए.आर. रहमानचे ऑस्कर विजेते गाणे ‘जय हो’ ची धून रसिक प्रेषकांच्या कानी पडणार आहे.याप्रसंगी इंग्लंड-भारत संस्कृती वर्षाची अधिकृतरीत्या सुरुवात होईल. २७ फेब्रुवारीला ‘बँड ऑफ ग्रेनेडियर गार्डस’ भारतीय संगीताची धून वाजवली जाईल. त्यामध्ये ‘स्लमडॅाग मिलेनियर’ या चित्रपटामधील गाण्याचाही समावेश केला आहे. संध्याकाळच्या वेळी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबत त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग, नातू प्रिंस विलियम आणि त्यांची पत्नी केट सुध्दा उपस्थित राहणार आहेत. बकिंघम पॅलेसने माहिती दिली की, या स्वागत समारंभात इंग्लंड आणि भारताची संस्कृती व भौगोलिक विविधतेचे दर्शन होईल. या कार्यक्रमामध्ये दोन्ही देशाचे विशिष्ट पाहुण्यांची उपस्थिती राहील. अर्थमंत्री अरुण जेटली भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील तसेच त्यांच्यासोबत भारतीय खासदार, अभिनेते आणि खेळाडूंचे एक शिष्टमंडळ असेल. या समारंभात कपील देव, रियो फर्नांडीज, अनुष्का शंकर आणि जो राईट यासारखे संगीत आणि खेळ जगतातील काही खेळाडू उपस्थित राहतील.