मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 2 जून 2025 (11:45 IST)

अमेरिकेत एका व्यक्तीने अनेक लोकांवर पेट्रोल बॉम्ब फेकले; ६ जण होरपळले

A terrorist incident has been revealed in America
लोकांच्या गटावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या दोन्ही हातात पेट्रोल बॉम्ब होते. नंतर त्याने ते लोकांवर फेकले. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत एक दहशतवादी घटना उघडकीस आली आहे. रविवारी अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील बोल्डर भागात एका व्यक्तीने अनेक लोकांवर हल्ला केला. हा हल्ला मोलोटोव्ह कॉकटेलने करण्यात आला. जो पेट्रोल बॉम्बसारखे काम करतो. या हल्ल्यात ६ जण गंभीर भाजले आहे. या घटनेबाबत अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने म्हटले आहे की हा लक्ष्यित दहशतवादी हल्ला आहे.
इस्रायली ओलिसांच्या स्मरणार्थ बोल्डरच्या बाहेरील मॉलबाहेर काही लोक जमले होते. त्यानंतर एक फिलिस्तीन समर्थक तिथे आला. त्याने तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या गटावर मोलोटोव्ह कॉकटेल (पेट्रोल बॉम्ब) फेकला. यात किमान सहा जण होळपले गेले.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की गाझामध्ये राहणाऱ्या इस्रायली ओलिसांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात हा हल्ला करण्यात आला.
Edited By- Dhanashri Naik