शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (16:21 IST)

वयाच्या 70 व्या वर्षी महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म

आई होण्याचा आनंद सर्वात मोठा आहे. आई बाळाला जन्म देताना किती तरी त्रास सहन करते पण आपल्या बाळाला बघून ती सर्वकाही विसरते.आई होणे काही सोपे नाही. मुलांचे व्यवस्थित संगोपन करण्यात ती स्वतःचा त्रास देखील विसरते. आई होण्याचे सुख प्रत्येकाने घ्यावा असे प्रत्येक महिलेला वाटते.किती तरी महिलांना मुलं उशिरा होत. पण युगांडात राहणाऱ्या एका महिलेने वयाचा 70 व्या वर्षी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. असं करून ती आफ्रिकेतील सर्वात वयोवृद्ध आई बनली आहे. या महिलेचं नाव सफिना नामुकवेया असून तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ती निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिने मुलांना जन्म दिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात मिठाईचे वाटप केले. 

सफिना ची गरोदरपणापासून ते प्रसूतीपर्यंतची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की ही प्रसूती IVF तंत्राने झाली आहे. तिला मुलं होत नसल्याने लोकं तिला सतत टोमणे मारायचे. तिने IVF पद्धतीने मुलं करण्याचा निर्णय घेतला तिला आई व्हायचं होत. तिची प्रसूती झाली आणि तिने जुळ्या मुलांनां जन्म दिला. बाळ आणि मुले निरोगी आहे. 
सफिनाच्या पहिल्या पतीच्या मृत्यू नंतर तिने लग्न केलं नाही. वय वाढत गेलं.

तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आली आणि तिला आई बनण्याची इच्छा झाली. पण वाढत्या वयात मातृत्व पत्करायला तिला भीती वाटत होती. तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि IVF पद्धतीने बाळाला जन्म देण्यास तयार झाली. डॉक्टरांनी गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत तिची योग्य काळजी घेतली. आणि तिने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र दुर्देवाने प्रसूती झाल्यानंतर तिचा प्रियकर तिला भेटायला सुद्धा आला नाही. तिला याचे दुःख आहे मात्र ती आई झाली ह्याचा तिला खूप आनंद होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit