शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (09:58 IST)

पाकिस्ताननंतर बांगलादेशातील मंदिरांवर हल्ले झाले, दुकाने आणि हिंदूंची घरे जाळण्यात आली

पाकिस्ताननंतर अल्पसंख्याक हिंदू समुदायावर पुन्हा एकदा बांगलादेशात हल्ला झाला आहे. या दरम्यान मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.याशिवाय हिंदूंची 100 घरे जाळण्यात आली आणि लुटण्यात आली. 
 
असे सांगितले जात आहे की शनिवारी म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील काही कट्टरपंथीयांनी अनेक घरांवर, दुकानांवर हल्ला केला आणि अल्पसंख्यांक हिंदू समाजाच्या चार मंदिरांची तोडफोड केली.घटना बांगलादेशच्या खुलना जिल्ह्यातील रुपशा उपजिल्ल्याच्या शियाली गावातील आहे. बांगलादेश हिंदू एकता परिषदेने आपल्या ट्विटर हँडलवर कट्टरपंथी इस्लामी दहशतवाद्यांनी मंदिर तोडफोडीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्याचबरोबर मंदिरांवर हल्ला केल्याप्रकरणी 10 जणांना अटकही करण्यात आली आहे.
 
हल्ल्यात 30 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांगलादेशच्या अनेक वृत्त संकेतस्थळांनीही या घटनेची माहिती दिली आहे. ढाकाच्या वृत्तानुसार, या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.