1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Army plane crashes in Colombia's southern Amazon region

हवाई दलाचे विमान कोसळले! 66 ठार

सोमवारी कोलंबियाच्या दक्षिण ॲमेझॉन प्रदेशात लष्कराचे विमान कोसळले, त्यात किमान ६६ जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आणि २१ जण बेपत्ता आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कोलंबियाच्या दक्षिण ॲमेझॉन प्रदेशात लष्कराचे विमान कोसळले, त्यात विमानातील १२५ पैकी किमान ६६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना कोलंबियाच्या हवाई दलाच्या अलीकडील इतिहासातील सर्वात प्राणघातक अपघातांपैकी एक होती. ढिगाऱ्यांमध्ये आणि राखेत अजूनही जवळपास दोन डझन लोक बेपत्ता आहे. 
पेरूच्या सीमेवर असलेल्या प्युर्टो लेगुइझामो येथून लॉकहीड मार्टिनने बनवलेले हर्क्युलस सी-१३० हे वाहतूक विमान उड्डाण करत असताना हा अपघात झाला.तसेच मृतांची आणि जखमींची आकडेवारी बदलू शकते.
अग्निशमन दलाचे जवान यांनी सांगितले की, विमान खाली उतरत असताना, त्याचा एक पंख झाडाला धडकला. त्यांनी पुढे सांगितले की, या अपघातामुळे विमानाला आग लागली आणि आत ठेवलेल्या काही स्फोटक उपकरणांचा स्फोट झाला.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
भारतीय रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये बदल केला, आता परतावा वेळेवर आधारित असेल