शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (13:35 IST)

डेन्मार्कच्या पंतप्रधानांवर हल्ला, हल्लेखोराला अटक

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर राजधानी कोपनहेगनच्या रस्त्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांना धक्का बसला आहे.
 
डेन्मार्कच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका चौकात एक व्यक्ती पंतप्रधानांच्या दिशेने आला आणि त्याने पंतप्रधानांवर हात उचलला. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
 
युरोपियन कमिशनर उर्सुला वॉन डेर लेन यांनी या हल्ल्याला 'घृणास्पद कृत्य' म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, युरोपमधील लोक ज्या तत्वांवर विश्वास ठेवतात आणि ज्यासाठी लढतात त्या धारणेच्या विरोधात हा हल्ला करण्यात आला आहे.
 
डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने या घटनेची माहिती देणारे निवेदन जारी केले आहे. या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी, पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर कोपनहेगनच्या कल्चरवेटमध्ये एका व्यक्तीने हल्ला केला. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे पंतप्रधानांना धक्का बसला आहे."
 
डेन्मार्कच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराची चौकशी सुरू आहे, मात्र हल्ल्यामागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.
 
Published By- Dhanashri Naik