गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 (10:01 IST)

अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाची पत्नी आणि मुलासमोर निर्घृण हत्या

Murder, Killing, Brother killed 2 sisters, Kozhikode, രണ്ട് സഹോദരിമാരെ കൊലപ്പെടുത്തി സഹോദരന്‍, കോഴിക്കോട് വാര്‍ത്തകള്‍
अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या नागरिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.आरोपीने त्याच्या पत्नी आणि मुलासमोर शिरच्छेद केला.
मिळालेल्या माहितीनुसार टेक्सासमध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. राज्यातील डलासमध्ये वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादातून ५० वर्षीय भारतीय वंशाचे मोटेल मॅनेजर चंद्र मौली 'बॉब' नागमल्लैया यांची हत्या करण्यात आली आहे. चंद्र मौली यांची हत्या त्यांच्या सहकाऱ्या योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ यांनी केली आहे. ही हत्या त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर करण्यात आली आहे.  
खरं तर, ही हत्या बुधवारी सकाळी लास वेगासमधील डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये घडली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या संशयित सहकाऱ्याला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी माहिती दिली आहे की, मूळ कर्नाटकातील चंद्र मौली 'बॉब' नागामल्लैया आणि त्याचा सहकारी योर्डानिस कोबोस यांच्यात तुटलेल्या वॉशिंग मशीनवरून वाद झाला होता.
Edited By- Dhanashri Naik