मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बीजिंग , शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (12:30 IST)

जगातील सर्वात लांब बुलेट ट्रेन

जगातील सर्वाधिक लांब असलेली बुलेट ट्रेन सेवा चीनमध्ये सुरू करण्यात आली आहे. या सुरू करण्यात आलेल्या बुलेट ट्रेनने अविकसित दक्षिण-पश्चिम भागाला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. शांघाई ते कुन्मिंग हा 2262 किलोमीटर लांबीचा बुलेट मार्ग शेजियांग, जियांगशी, हुनान, गुईझोऊ आणि युन्नान या पाच शहरांतून जाणार असून 34 तासांचे अंतर आता केवळ 11 तासांत पार करता येणार आहे, असे चीनच्या रेल्वे कॉर्पोरेशन विभागाने सांगितले आहे. ही सुरू करण्यात आलेली बुलेट ट्रेन ताशी 330 कि. मी. ने धावणार असल्याचे ट्रेनचा ड्रायव्हर वाँग जिनदा यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. बीजिंग गुआंगशोऊ हा 2298 कि. मी. लांबीचा रेल्वेमार्ग हा चीनमधील सर्वात जास्त लांबीचा रेल्वेमार्ग असून चीनमध्ये सध्या 20,000 पेक्षा अधिक कि. मी. लांबीचे जलदगती रेल्वेचे जाळे तयार करण्यात आलेले आहे.