चीनची भारताला धमकी
जर भारत आण चीनमध्ये युद्ध झाले तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहचतील अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. दोन देशांमध्ये युद्ध झाले तर केवळ 10 तासात पॅराशूटच्या साहाय्याने आमचे जवान राजधानी दिल्लीत पोहचतील असे चिथावणीखोर वक्तव्य चिनी मीडियाने केले आहे.
युद्धाला सुरुवात झाल्यास पॅराशूटच्या साहाय्याने चीनच्या सैनिकांना दिल्लीपर्यंत पोहचायला केवळ 10 तास लागतील तर फक्त 48 तासात आमचे जवान मोटार सायकलच्या साहाय्याने दिल्लीत पोहचतील असा दावा चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलने केला आहे.
इंटरनॅशनल स्पेक्टेटरने ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारताविरोधात चिनी मीडियाचा हा उद्धेग काही नवा नाहीये किंवा चिनी मीडियाने भारताला अशा प्रकारे धमकी देण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. तरी यावेळी चीनच्या धमकीला ट्विटरसह सोशल मीडियातून उत्तर दिले जात आहे.