गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2017 (12:19 IST)

चीनचे हिंद महासागरात शक्तीप्रदर्शन

सिक्कीम सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारतही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याने चीनने आता समुद्रात शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. मागच्या काही दिवसात हिंद महासागरात चीनी युद्धनौकांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, समुद्रातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष आहे. 

 
सिक्कीमच्या डोकलाम भागात चीनच्या रस्ते बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्याने हा सर्व तणाव निर्माण झाला आहे.  भारताने इथून मागे हटावे यासाठी चीन युद्धखोरीची भाषा करुन  भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीनने आता हिंद महासागरात युद्धनौकांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागच्या दोन महिन्यात जीसॅट-7 उपग्रह, Poseidon-8I टेहळणी विमान आणि भारतीय युद्धनौकांना हिंद महासागरात चीनी नौदलाच्या 13 युनिटस आढळल्या आहेत. यात क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विनाशिकांचा समावेश आहे.