शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शनिवार, 29 एप्रिल 2017 (08:11 IST)

भारतीयाचा अमेरिकेमध्ये गोळीबारात मृत्यू

अमेरिकेतील टेनेसी राज्यातील एका हॉटेलबाहेर दोन गटांत उडालेल्या चककीत सापडल्याने एक छप्पन्नवर्षीय भारतीय इसम मृत्युमुखी पडला. मागच्या फेब्रुवारीपासून अमेरिकेत आतापर्यंत भारतीय समुदायाचे पाच जण मरण पावले आहेत. याबाबत फॉक्स १२ मेम्फिस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दोन मुलांचा पिता असलेले खांडू पटेल हे अमेरिकाज् बेस्ट व्हॅल्यू इन अँण्ड स्युट्स इन व्हाइटहेवनमध्ये हाऊसकीपर म्हणून कामाला होते. सोमवारी ही घटना घडली तेव्हा ३0 गोळय़ा झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी पटेल यांना लागली. त्यावेळी ते हॉटेलच्या मागच्या बाजूला उभे होते, नंतर त्यांचे एका स्थानिक रुग्णालयात निधन झाले. खांडू पटेल हे गेल्या आठ महिन्यांपासून या इनमध्ये कामाला होते. त्यांची पत्नी व मुले त्यांच्यासोबत हॉटेलमध्येच राहात होती. मृताच्या पुतण्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, खांडू पटेल यांनी त्यांचे काम पूर्ण केले होते आणि ते बाहेर फिरत होते. त्याच वेळी त्यांनी हॉटेलच्या आसपास गोळय़ा झाडल्याचा आवाज ऐकला. त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत घुसली.