1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. donald trump

ट्रम्प यांचे सुटाबुटातील सरकार

'अब की बार, ट्रम्प सरकार' असे म्हणत अमेरिकेतील भारतीयांना साद घालणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुटाबुटातील सरकारने अनेकांना काळजीत टाकले आहे. मोठ्या प्रमाणावर संपत्ती आणि रोजगारांची निर्मिती करणार्‍या उद्योजकांबद्दल अमेरिकन समाजात आदर असला तरी आजवर त्यांचा प्रशासनात मोठ्या प्रमाणावर सहभाग नव्हता. पण क्लिंटन कुटुंबियांनी कॉर्पोरेट कंपन्यांच्या देणग्यांतून जमविलेली कोट्यावधीची माया हा निवडुकींतील प्रचाराचा मुख्य मुद्दा करून हिलरी क्लिंटन यांना धूळ चारणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक जागा अमेरिकेतील बड्या उद्योजक आणि गुंतवणूकदारांना दिल्या आहेत. 'अबकी बार, ट्रम्प सरकार' असे म्हणत अमेरिकेतील भारतीयांना साद घालणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुटाबटातील सरकारने अनेकांना काळजीत टाकले आहे. 
पुढील लेख
पाच वर्षात 2 हजाराची नोट बंद होणार