ट्रम्प यांना भेटण्यासाठी द्या 5 लाख डॉलरची देणगी
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांना सामाजिक कार्यासाठी पैसे उभारण्यापासून रोखल्याने गरजू लोकांना त्याचा त्रास होईल, 'असे ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार केल्लेनी कॉनवे यांनी म्हटले आहे. है पैसे उभारण्यामागील हेतूबद्दल वाद सुरू झाल्यावर त्यावर टीक होत असून, अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय चर्चेत आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांनी चालविलेल्या एका टेक्सासस्थित स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांना पर्यावरण संवर्धनासाठी लाखो डॉलरच्या देणग्या घेण्यात येत आहेत, असे सेंटर फॉर पब्लिक इंटिग्रिटीने म्हटले आहे.