गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , मंगळवार, 4 एप्रिल 2017 (11:20 IST)

ट्रम्प यांचे जावई कुशनर इराकच्या दौर्‍यावर

Marathi news
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनर ये इराकच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. अमेरिकन लष्पराचे प्रमुख मरीन जनरल जोसेफ डनफोर्ड हेही त्यांच्यासोबत असल्याचे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. इराकी पंतप्रधान हैदर अल आबादी यांची प्रथम 20 मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सांगितले की, इस्लामिक स्टेट तथा इसिसशी लढण्यासाठी अमेरिकेचा भरीव पाठिंब्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. परंतु केवळ लष्करी सामर्थ्य हे त्यासाठी पुरेसे ठरणार नाही, असे ही त्यांनी म्हटले होते.