शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

भारतीय इंजिनियरची हत्या अस्वस्थ करणारी: व्हाइट हाऊस

नवी दिल्ली- कन्सास शूटिंगप्रकरणी अखेर डोनाल्ड ट्रम्प सरकारने 6 दिवसांनी मौन सोडले आहे. कन्सासमध्ये भारतीय इंजिनियरची हत्येची घटना अस्वस्थ करणारी असल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.
 
दरम्यान, 22 फेब्रवारीला सायंकाळी ओलाथे येथील एका बारमध्ये नेव्हीच्या माजी अधिकार्‍याने क्षुल्लक कारणावरून गोळी झाडून भारतीय इंजिनियर श्रीनिवास कुचीभोतला याची हत्या केली होती. माझ्या देशातून चालते व्हा, असेही त्याने म्हटले होते. या घटनेत श्रीनिवासचा एक मित्र आलोक मदसानी आणि अमेरिकन नागरिक इयान ग्रिलट जखमी झाला होता.
 
कन्सासमधील घटना हेट क्राइम व्हाइट हाऊसचे मीडिया सचिव शॉन स्पाइसर यांनी सांगितले की कन्सासमधील घटनेला हेट क्राइम संबोधले जात आहे. या घटनेचा प्राथमिक अहवाल धक्कादायक आहे.
 
अमेरिकेत यहूदी कम्युनिटी सेंटवर्सवर होणार्‍या हल्ल्यांना आम्ही सुरूवातीपासून विरोध करत आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
 
भारतीय दूतावासांनी भारतीय इंजिनियर हत्येचे प्रकरण उचलून धरले आहे. या प्रकरणाची चौकशी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.