पाकच्या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल सत्तार यांचे निधन
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल सत्तार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. परवेझ मुशर्रफ राष्ट्राचे प्रमुख असताना सन 1999 ते 2002 या काळात ते पाकिस्तानचे विदेश मंत्री होते. त्या आधी त्यांनी विदेश मंत्रालयात राजनितीज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
अटलबिहारी वाजपेयी आणि परवेझ मुशर्रफ यांच्यात आग्रा येथे जी ऐतिहासिक शिखर बैठक झाली होती त्यावेळी ते पाकिस्तानच्यावतीने उपस्थित होते. ते 1986 ते 1988 या काळात विदेश सचिव पदावरही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने आम्ही एक कुशल राजनितीज्ञ आणि एक चांगला लेखक गमावला आहे अशी प्रतिक्रीया पाकिस्तानच्या विदेश व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या विदेश धोरणावर एक व्यापक पुस्तकही लिहीले आहे. त्याचे जाणकारांनी मोठे कौतुक केले होते.