शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अवकाशातही कचर्‍याची गंभीर समस्या

अवकाशात सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साठू लागला आहे. यामुळे तो वेळीच हटवण्यासाठी युरोपीय स्पेस एजन्सीने आंतरराष्ट्रीय सहकार्यांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. या कचर्‍यामुळे सध्या अवकाशात कार्यरत असलेल्या उपग्रहांना धोका निर्माण झाला आहे.
 
पृथ्वीवरील अनेक देशांनी मोठ्या संख्येने अवकाशात पाठवलेले उपग्रह आपल्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरत आहेत. याबरोबरच अनेक प्रकारचा कचराही फिरत आहे. अशा स्थितीत हा कचरा आणि उपग्रह यांच्यात टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास उपग्रहांचे मोठे नुकसान होईल अथवा ते निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
युरोपीय स्पेस एजन्सीचे प्रमुख यान वोएर्नर यांनी जर्मन शहर डार्मश्टाट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सांगितले की अवकाशातील कचरा हटवण्याचे काम जगातील कोणताही एक देश करू शकत नाही. ही समस्या गंभीर बनू लागल्याने सर्वांच्या सहकार्यांने तो हण्याची गरज आहे.
 
अवकाशात सध्या 7 लाख 50 हजार अशा लहान, मोठ्या वस्तू प्रचंड वेगाने फिरत आहेत. त्यांचा व्यास 1 ते 10 सेंटीमीटपर्यंतही असू शकतो. या वस्तू लहान असल्या तरी त्या अत्यंत धोकादायक ठरू शकतात. कारण, एखादा लहान तुकडाही मोठे विमान अथवा उपग्रहाला नष्ट करू शकतो. हा कचरा हटवण्याचा गेल्या वर्षी जपानने केलेल्या प्रयत्न अपयशी ठरला होता.