बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (16:57 IST)

भारतानं रोडमॅप समोर ठेवावा, चर्चेला तयार - इम्रान खान

भारतानं काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा देण्याच्या दृष्टीने रोडमॅप ठेवल्यास चर्चा करायला तयार आहोत, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केलं.
काश्मीरवरील नियंत्रणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू आहे. 2019 मध्ये भारतानं काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला आणि या वादाला नव्या चर्चेचं रूप आलंय.
"जर रोडमॅप असेल, तर होय, आम्ही चर्चेला तयार आहोत," असं इम्रान खान यांनी इस्लामाबादमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं.
 
"संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधात घेतलेले बेकायदेशीर निर्णय मागे घेण्यासाठी अशी पावलं उचलू, असा काही रोडमॅप असेल, तरच ते स्वीकारार्ह आहे," असंही इम्रान खान यांनी नमूद केलं.
 
भारतीय पराष्ट्र मंत्रालयानं अद्याप इम्रान खान यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नाही.