1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Indian engineer murder in Amerirca

अमेरिकेत भारतीय अभियंत्याची गोळी झाडून हत्या

अमेरिका
अमेरिकेतील कान्सस शहरातील एका बारमध्ये हैदराबादच्या एका अभियंत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोराने गोळी झाडण्यापूर्वी गेट आऊट ऑफ माय कंट्री असे ओरडून म्हणला असल्याचे समजते. यामध्ये अजून एक भारतीय गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली. 

श्रीनिवास कुचिभोतला असे मृत भारतीय अभियंत्याचे नाव आहे. तो अमेरिकेतील एका एव्हिएशन कंपनीत कामाला होता. त्याच्या जखमी सहकाऱ्याचे नाव आलोक मदासनी आहे. आरोपीची ओळख पटली असून ऍडम प्यूरिंटन असे त्याचे नाव आहे. प्यूरिंटन हा अमेरिकन नौदलाचा माजी कर्मचारी आहे. ही घटना बुधवारी सांयकाळी 7.15 च्या सुमारास घडली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अभियंत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
पुढील लेख
मिझोराममध्ये डॉक्टर आमदारांनी केली शस्त्रक्रिया