गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन (अमेरिका) , बुधवार, 12 जुलै 2017 (11:15 IST)

भारतीयांना अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी 12 वर्षांचा प्रतीक्षाकाल

अमेरिकेत कायमच्या वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड लागते. ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या कुशल कामगार भारतीयांना 12 वर्षांचा प्रदीर्घ प्रतीक्षाकाल असल्याची माहिती एका ताज्या अहवालात देण्यात आली आहे. मात्र तरीही ग्रीन कार्डस मिळणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो.
 
सन 2015 मध्ये 36,318 भारतीयांनी आपली स्थिती कायमचे रहिवासी म्हणून समायोजित करून घेतली, तर नवीन आलेल्या 27,798 भारतीयांना ग्रीन कार्ड देण्यात आल्याचे प्यू संशोधनात म्हटले आहे. एकच नोकरी विभागात ग्रीन कार्डसाठी 12 वर्षांचा प्रतीक्षाकाल आहे, म्हणजेच मे 2005 मध्ये केलेल्या अर्जांवर आता कार्यवाही होत आहे. प्यूने दिलेल्या माहितीनुसार सन 2010 ते 2014 या काळात नोकरी संबंधित ग्रीन कार्डसपैकी 36 टक्के म्हणजे 2,22,000 एच1-बी व्हिसाधारकांना ग्रीन कार्ड देण्यात आले. ग्रीन कार्डधारकांना 5 वर्षांनंतर अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो.
 
सन 2015 मध्ये 5,08,716 नवागतांना ग्रीन कार्ड देण्यात आले, तर 5,42,315 जणांनी आपली स्थिती कायमचा रहिवासी म्हणून समायोजित करून घेतली. सन 2015 च्या ग्रीन कार्ड मिळणारांध्ये नोकरीसंबंधित (त्यांच्या कुटुंबीयांसह) ग्रीन कार्ड मिळणारांचे प्रमाण 14 टक्के होते. निर्वासितांचे प्रमाण 11 टक्के आणि आश्रय देण्यात आलेल्यांचे प्रमाण3 टक्के होते.