सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अमेरिकेत मुस्लिमबहुल निर्वासितांना प्रवेश नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेमध्ये नो एन्टी लागू  केली आहे.  या संबंधीचा एक नवा आदेश जारी केला आहे.

कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यास हा निर्णय घेण्यात आला आहे. सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यात समावेश आहे. दरम्यान, या निर्णयामुळे किमान 4 महिने तरी या सात देशांतील निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. कारण पुनर्वसन कार्यक्रमाला 120 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय 90 दिवसांपर्यंत व्हिसाही दिला जाणार नाही.