शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (09:34 IST)

मँचेस्टर दहशतवादी हल्ल्या मागे 'इसिस'

मँचेस्टर अरिनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'इसिस' या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. आमच्या एका 'सैनिका'ने हा हल्ला केल्याचं इसिसनं जाहीर केलं आहे.  दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानंतर इसिसच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. याचा एक व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'इराकमधील हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला', असा दावाही केला जात आहे. मँचेस्टर शहरात झालेल्या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला . तर  59 जण जखमी झाले. मँचेस्टरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा भीषण हल्ला झाला आहे, असं वक्तव्य ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलं आहे.