शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (09:46 IST)

हमासचे मुख्य नेते इस्माईल हानिये इराणमध्ये मारले गेले - हमासची माहिती

ismail haniyah
हमास संघटनेचे मुख्य नेते इस्माईल हानिये इराण मारले गेले आहेत.
 
इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, इस्माईल हानिये तेहरानमध्ये मारले गेले आहेत.
 
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोर म्हणजे आयआरजीसीने आज (31 जुलै) या घटनेची माहिती दिली. आयआरजीसीनुसार, इस्माईल हानियेंसोबत त्यांचे काही सुरक्षारक्षकही मारले गेले आहेत.
 
हमासच्या माहितीनुसार, इस्माईल हानिये इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या पदग्रहण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेहरानमध्ये गेले होते.
 
इस्माईल हानिये कतारमध्ये राहत असे.
 
इस्माईल हानिये कोण होते?
इस्माईल हानिये हे हमासचे मुख्य नेता मानले जातात.
 
1980 च्या दशकाच्या शेवटी हमास ही संघटना उदयाला आली होती. इस्रायलने इस्माईल हानिये यांना 1989 मध्ये तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकलं होतं. पॅलेस्टाईनच्या चळवळीला चाप लावण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल होतं.
 
1992 मध्ये ते इस्रायल आणि लेबननमधील भागात हमासच्या इतर नेत्यांबरोबर अज्ञातवासात गेले.
 
एक वर्ष अज्ञातवासात घालवल्यानंतर ते गाझामध्ये परतले. 1997 मध्ये त्यांना हमासचा प्रमुख नेता म्हणून निवडण्यात आलं.
 
2006 मध्ये त्यांना पॅलेस्टाईनचे पंतप्रधान म्हणून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बासय यांनी नियुक्त केलं. त्यावर्षीच्या निवडणुकांत हनिया यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र, एकाच वर्षांत त्यांना पायउतार व्हावं लागलं. अब्बास यांच्या फतेह पक्षाला गाझा पट्टीत आठवडाभर झालेल्या हिंसाचारानंतर काढून टाकण्यात आलं. यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं.
 
हानिये यांची बरखास्ती राज्यघटनेला धरून नसल्याचं म्हटलं आणि पॅलेस्टिनी लोकांची जबाबदारी ढकलणार नाही असं म्हणत गाझावर राज्य करत राहिले.
 
2017 मध्ये हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
 
2018 मध्ये यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटने त्यांना 'दहशतवादी' घोषित केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ते कतारमध्ये राहत होते.