शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: जर्मनी , सोमवार, 19 जून 2017 (08:49 IST)

जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचे निधन

आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचे निधन झाले आहे. त्यांनी जर्मनीचे चान्सेलर पद सर्वाधिक काळ भूषवले होते. जर्मनीच्या एकीकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. शीतयुद्धाच्या काळात ते जगातील सर्वात आवडत्या नेत्यांमधील एक होते. हेलमुट कोल 1982 ते 1998 सालापर्यंत जर्मनीच्या चान्सेलर पदावर कार्यरत होते. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
त्यांनी पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीला एकत्रित केल्यामुळे त्यांना फादर ऑफ रि-युनिफिकेशनच्या नावानेही संबोधलं जाते. तसेच शीतयुद्धाच्या काळात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश सीनियर यांनी 20 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण नेते म्हणून हेलमुट यांचा उल्लेख केला होता.