बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2017 (11:48 IST)

कुलभूषण जाधव प्रकरण : 15 मे ला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

kulbhushan jadhav

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीदरम्यान पाकिस्तान काय भूमिका मांडणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतरही पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक  झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय हा भारतासाठी मोठा विजय मानला जात आहे.