मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 मे 2017 (08:56 IST)

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निकाल

kulbhushan jadhav
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात लागणार आहे.
 
भारत आणि पाकिस्तानचा युक्तीवाद पूर्ण झाला असून उद्या (गुरुवारी) 3.30 वाजता याबाबत निकाल सुनावला जाणार आहे.
 
सोमवारी झालेल्या सुनावणीत ज्या व्हिडिओच्या आधारावर पाकिस्तान आपली बाजू मांडणार होते, तो कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडिओ कोर्टात दाखवण्यास परवानगी नाकारात आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानाला मोठा दणका दिला होता.
 
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
 
त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वीच कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
 
भारताच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी भारताची बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, असा दावा भारताच्या वतीने कोर्टासमोर करण्यात आला.
 
15 एप्रिलला (सोमवारी) दुपारी दीड वाजता सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीचं थेट प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवर करण्यात आलं.
 
हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली.
 
त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.