शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकिस्तानची वाईट प्रतिमा नागरिकांमुळेच - मलाला

जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार असल्याचे नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने सांगितले आहे. ईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. इतकी बेदमी मारहाण केली यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.  या घटनेसंदर्भातच बोलताना मलालानं पाकिस्तानवर ही टीका केली आहे. जगभरात पाकिस्तानचे नाव खराब होण्याला दुसरे कोणी नाही तर स्वतः पाकिस्तानच जबाबदार आहे, असे वक्तव्य तिनं केले आहे.