मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2024 (11:47 IST)

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू

Mexico News: उत्तर-मध्य मेक्सिकोमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात बंदुकधारींनी ग्राहक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांवर गोळीबार केल्याने आठ जण ठार झाले आणि दोन जण जखमी झाले. तसेच या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून हे अपासियो एल ग्रांडे शहरात झाले. या प्रांतात टोळ्यांमध्ये गोळीबाराच्या घटना समोर येत आहे. या गोळीबारात एक पुरुष आणि एक महिलाही जखमी झाली आहे. जखमींच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात एका आरोग्य कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये, दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलमध्ये डोक्यावर जखमांच्या खुणा असलेल्या पुरुषांचे मृतदेह दिसत होते. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये मेक्सिकोच्या दक्षिण-पूर्व भागात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. गोळीबाराची ही घटना ताबास्को या तटीय प्रांतात घडली. या हल्ल्यात सहा जण ठार तर पाच जण जखमी झाले. इतकंच नाही तर नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये बंदुकधारींनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये 10 जण ठार आणि 13 जण जखमी झाले होते.

Edited By- Dhanashri Naik