Daily Horoscope
✕

पाकमध्ये मुलींचे विवाहयोग्य वय १८ वर्षे करणे गैरइस्लामी!

Updated: शनिवार, 6 मे 2017 (10:19 IST)
 
खासदार किश्‍वर जेहरा यांनी सादर केलेल्या बालविवाहविरोधी विधेयकातील सुधारणांवर पाकिस्तानी संसदेतील धर्मविषयक स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लिम खासदारांसह हिंदूआणि ख्रिश्‍चन खासदारांनीही प्रस्तावित सुधारणेस विरोध दर्शविल्याचे 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तात म्हटले आहे. प्रस्तावित सुधारणा या गैरइस्लामी असल्याचे समितीने म्हटले आहे. मुलींचे विवाहासाठीचे वय १६ वरून १८ वर्षे करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आलेली होती. याशिवाय अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी राष्ट्रीय आयोग कायद्यावरही समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. खासदार लालचंद मल्ही यांच्या विनंतीवरून ही चर्चा करण्यात आली. सर्व अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आयोगाची सदस्य संख्या वाढविण्याची शिफारस ख्रिश्‍चन खासदार तारिक क्रिस्टोफर कैसर यांनी यावेळी केली. अल्पसंख्याकांना आपले लोकप्रतिनिधी थेट निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली. यावर चर्चेसाठी समितीने एका उपसमितीची स्थापना केली आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

'आनंदाचा शिधा' बंद! महाराष्ट्रात ८३ हजार कुटुंबांची दिवाळी फीकी

LIVE: यंदा गरिबांची दिवाळी फीकी! राज्यभरात 'आनंदाचा शिधा' बंद; ८३ हजार कुटुंबांचे हाल

विरारमधील बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले; मृत्यूआधी रेकॉर्ड केला व्हिडिओ; आत्महत्येचा संशय

आनंदाची बातमी! BMC कर्मचाऱ्यांना ३३ हजार दिवाळी बोनस, तब्बल ९३ हजार कर्मचाऱ्यांना फायदा

१ नोव्हेंबरपासून महामार्ग टोल प्लाझावर कोणते नियम बदलत आहेत? येथे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments