पाकमधील 'दंगल'चा फैसला नवाज शरीफांच्या हाती
पाकिस्तानात भारतीय सिनेमांवरील बंदी काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आली आहे. मात्र, आमिर खानचा 'दंगल' सिनेमा येथील थिएटरमध्ये दाखवण्याबाबत अजूनही गोंधळ कायम आहे. पाकिस्तानात 'दंगल' सिनेमा प्रदर्शित करायचा की नाही याबाबतचा निर्णय घेणे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे. आमिर खानचा 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणे न होणे आता शरीफ यांच्या सहमतीवर अवलंबून आहे. त्यामुळे दंगल पाकिस्तानात प्रदर्शित होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'माहिती व प्रसारण मंत्रालय आणि ब्रॉडकास्टिंग अँड नॅशनल हेरिटेज ने 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात रिलीज करण्यासंदर्भात शरीफ यांची परावनगी मागितली आहे.