शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :इस्लामाबाद , मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:06 IST)

नवाझ शरीफ यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड आज

पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ शरीफ गट)चे नेते शाहिद खकान अब्बासी यांची पंतप्रधान पदासाठी उद्या (मंगळवारी) निवड होणार आहे. अब्बासी यांनी आज पंतप्रधानपदासाठीचा दावा करणारी कागदपत्रे अब्बासी यांनी आज सादर केली. उद्या संसदेमध्ये पंतप्रधान निवडीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर कालावधीनंतर पंतप्रधानपद नवाझ शरीफ यांचे बंधू शेहबाझ यांच्याकडे सोपवले जाण्याचे नियोजन “पीएमएल-एन’ पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
अब्बासी हे पाकिस्तानमधील आघाडीचे उद्योजक आणि एअरब्लू या खासगी विमान कंपनीचे मालक आहेत. संसदेमध्ये बहुमत सिद्ध करणे “पीएमएल-एन’ पक्षाला सहज शक्‍य होईल. त्यानंतरच नवीन सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन होईल, असे अब्बासी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संसदेच्या सचिवालयामध्ये पंतप्रधानपदासाठीच्या निवडणूकीची कागदपत्रे सादर केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पाकिस्तानच्या संसदेतील 342 सदस्यांच्या सभागृहामध्ये “पीएमएल- एन’ पक्षाकडे 188 सदस्यांचे संख्याबळ आहे. अन्य सहकारी पक्षांकडून पाठिंबा मिळाल्यास “पीएमएल-एन’ पक्षाला 214 सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अब्बासी यांना बहुमत सिद्ध करणे सहज शक्‍य असल्याचे मानले जात आहे.