शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ही डॉल नव्हे मुलगी आहे (Video)

बार्बी डॉल सारखं फिगर असावं असं स्वप्न प्रत्येक मुलगी बघत असते परंतू हे काही शक्य नाही. परंतू एका मुलीचं फिगर बघून या गोष्टीवर विश्वास ठेवणं आपल्याला भाग पडेल. ही फोटो मॉडल न्यादाक थॉट हिची आहे. प्रेमाने हिला डकी अशीही हाक मारतात. केवळ आपल्या त्वचेच्या रंगामुळे नव्हे तर चेहर्‍याच्या फीचर्स आणि सडपातळ देहामुळे ही चर्चेत आहेत.
 
मऊ चेहरा, सिल्की केस, सडपातळ शरीर पाहिल्यावर अधिकश्या लोकांना विश्वासच बसत नाही की डॉल नसून जिवंत मुलगी आहे. वर्ष 2013 मध्ये डकी पहिल्यांदा चर्चेत आली होती. तिने वयाच्या 17 व्या वर्षी रिअलिटी शो 'ऑस्ट्रेलियाज नेक्स्ट टॉप मॉडल' यात भाग घेतला होता परंतू लोकांनी तिच्यावर थट्टा केल्यामुळे ती फॅशन इंडस्ट्रीपासून दूर निघून गेली होती.
 
सुमारे चार वर्षांनंतर तिने पुन्हा धडाकेदार वापसी करत इंस्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट केले. आणि बघता-बघता ती चर्चेचा विषय झाली. तिची तुलना बार्बी डॉलसोबत होऊ लागली. हिच्या जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून आता ती अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात राहत. डकीला बघून सर्वांना ती डॉल असल्याचा भास होतो.