रविवार, 18 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (10:01 IST)

#पाक ट्रम्प मुळे टेन्शन मध्ये

pakistan
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्‍प यांनी  बाजी मारली आहे. मात्र यामुळे  पाकिस्तान फारच अडचणीत सापडले आहे. नवनियुक्त अध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेचं पाकिस्तानबद्दल धोरण बदलेल असे अनेक राजकारणी बोलत आहेत. तर अमेरिका आपला मित्र म्हणून  भारताच्या बाजुने जास्त विचार करणार आहे विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
ट्रम्प पुर्वी मुस्लिमांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी करावी असं म्हणाले होते. भारतात त्यांचे असलेल्या व्यावसायिक संबंधांमुळे नवी दिल्लीच्या दिशेने त्यांचा झुकाव वाढणार आहे. तर आशीयात सर्वाधिक घातकी देश असलेल्या पाकिस्तानबाबत ते कठोर भूमिका ठेवतील अशी शक्यता वर्तवली  आहे.  अमेरिका पाकिस्तानला पुर्णतः वा-यावर सोडणार नाही मात्र त्यांचा कल हा भारताकडे निश्चित जास्त असेल, हिलरी क्लिंटन यांच्याशी तुलना केली तर ट्रम्प हे पाकिस्तानसाठी जास्त कठोर असतील असं लाहोर येथील परराष्ट्र धोरण विश्लेषक हसन अस्कारी रिझवी म्हणाले आहेत. त्यामळे पाक सध्या खरया टेन्शन मध्ये आहे. ट्रम्प यांच्या उघड मुस्लीम विरोधामुळे पाक आणि इतर देशांना आता दोनदा विचार करून अमेरिकेसोबत नाते जोडावे लागणार आहे.