बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2017 (16:55 IST)

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नौशेरा आणि कृष्णा घाटीमध्ये गोळीबार केला. या गोळीबारात जनरल रिजर्व इंजिनिअरिंग फोर्सचा एक जवान शहीद झाला आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिकही जखमी झाले आहेत. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तसंच घटनास्थळावरुन दोन एके-47 आणि मोठ्या प्रमाणात बॉम्ब हस्तगत केले. तेथील परिस्थिती पाहता उत्तर काश्मीरमधील मोबाइल सेवा बंद करण्यात आली आहे. बारामुला, हंदवाडा, कुपवाडा आणि सोपोरमध्ये मोबाइल सेवा बंद आहेत. तसेच सर्व इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.