1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. pervez-musharraf-kulbhushan-jadhav-bigger-terrorist-than-ajmal-kasab

कुलभूषरप्रकरणी पराभव झालेला नाही - मुशर्रफ

कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानचा पराभव झालेला नाही. न्यायालयाने केवळ फाशीला स्थगिती दिली आहे. तसेच, जाधव यांना वकील देण्याचा आदेशही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला नाही, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी केला आहे. जाधव यांना वकील देण्याबाबत निर्णय झाला नसून, याबाबत चर्चा करण्याची तयारी न्यायालयाने दाखविली असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले. प पाकिस्तानी बाजू मांडण्यासाठी खावर कुरेशी यांच्या निवडीचेही समर्थन त्यांनी केले. तयारी करण्यासाठी केवळ पाच दिवस असल्याने एकमताने त्यांनी निवड केल्याचे मुशर्रफ म्हणाले. 
 
पुढील लेख
एलिनाला रोम मास्टर्सचे ताज