बुधवार, 3 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मे 2017 (16:59 IST)

येत्या २९ मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांचा दौऱ्यावर

Pm Modi To Visit Spain Germany Russia From May 29

पंतप्रधान नरेंद्र मोदी  २९ मेपासून तीन देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जर्मनी, स्पेन आणि रशियाला भेट देणार आहेत. मोदी तीन देशांच्या दौऱ्याची सुरुवात जर्मनीपासून करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीच्या दौऱ्यादरम्यान चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेणार आहेत. उभय देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मोदी मर्केल यांची भेट घेणार आहेत. उभय देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी पंतप्रधान मोदी जर्मनी आणि स्पेनला भेट देणार आहेत. तर रशियात पंतप्रधान मोदी सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरममध्ये (एसपीआयईएफ) सहभागी होणार आहेत. १ ते ३ जून या कालावधीत या फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. एसपीआयईएफमध्ये जगभरातील कंपन्या, उद्योगपती यांचा सहभाग असतो. त्यामुळे या कार्यक्रमातून भारतात अधिक परकीय गुंतवणूक आणण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न असणार आहे. एसपीआयईएफमध्ये सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतील. द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी पुतीन यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि अणुउर्जा क्षेत्रातील सहकार्य हे मोदी-पुतीन यांच्या भेटीतील चर्चेचे मुख्य मुद्दे असणार आहेत.