शिगेरू इशिबा जपानचे पंतप्रधान, पुढील आठवड्यात पदभार स्वीकारणार
माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा (67) यांची शुक्रवारी जपानच्या सत्ताधारी पक्षाने नेता म्हणून निवड केली. पुढील आठवड्यात ते पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. या पक्षाच्या निवडणुकीत दोन महिलांसह नऊ उमेदवार रिंगणात होते. पक्षाच्या खासदार आणि तळागाळातील सदस्यांनी मतदानाद्वारे इशिबा यांची निवड केली.
सध्याचे पंतप्रधान फुमियो किशिदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेले आहेत आणि पुढील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्याच्या आशेने त्यांचा पक्ष नवीन नेत्याचा शोध घेत आहे.
माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा, आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाईची आणि माजी पर्यावरण मंत्री शिंजिरो कोइझुमी या शर्यतीत आघाडीवर होते. इशिबा मीडियाच्या सर्वेक्षणातही आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.
जपानचे विद्यमान पंतप्रधान किशिदा आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री मंगळवारी राजीनामा देणार आहेत .
Edited By - Priya Dixit