आपल्या हातात आता कमी वेळ राहिला आहे. लवकर हालचाली केल्या नाहीत, तर मोठा अनर्थ ओढावू शकतो. मानवाला परग्रहावर वास्तव्य करावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगभरात माणसाने केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरणार आहे, असेही हॉकिंग म्हणाले. माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांमुळे तर पृथ्वीचा विनाश आणखी जवळ येईल असा दावाही त्यांनी केला आहे.