शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (14:38 IST)

उत्तर वझिरिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात रविवारी आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून पाकिस्तानी लष्कराचे तीन सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने रविवारी ही माहिती दिली.
 
लष्कराच्या मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (ISPR) या संदर्भात एक निवेदन जारी केले. ISPR ने दिलेल्या माहितीनुसार, येथून 250 किमी अंतरावर असलेल्या मीरान शाह शहरात ही घटना घडली. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे वय 4 ते 11 वर्षे वयोगटातील आहे.
 
या हल्ल्यात तीन जवानांचाही मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. आयएसपीआरने सांगितले की, गुप्तचर संस्था आत्मघातकी हल्लेखोर आणि त्याच्या हस्तकांचा शोध घेण्यासाठी तपास करत आहेत.
 
 पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आत्मघातकी हल्ल्याचा निषेध केला आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी एक निवेदन जारी करून मुलांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनीही हल्ल्याचा निषेध केला.