गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (16:40 IST)

19 व्या मजल्यावरुन खालीपडून जिवंत

Twitter
ज्याला दैव तारी त्याला कोण मारी  असे म्हटले जाते. कधी कधी हे प्रत्यक्षात दिसून येत.सध्या सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे आपल्याला विचार करण्यासाठी बाध्य करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याला पाहून आश्चर्याचा धक्का लागत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 19 व्या मजल्यावरून खाली पडून देखील जिवंत आहे. एवढेच नाही तर हा माणूस स्वतःच्या पायावर चालत रुग्णालयात गेला. सदर व्यक्ती मद्यपान केली असून मद्यधुंद अवस्थेत एका इमारतीच्या 19 व्या मजल्यावरून खाली एका कारवर जाऊन पडतो आणि त्या कारचा चुरडा होतो. पण त्या व्यक्तीला  काहीच झाले नाही. तो सुखरूप असल्याचे दिसत आहे.