सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2017 (10:56 IST)

पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

sushma swaraj
पोलंडमधील पोझनानमध्ये ट्राममध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
 
हल्लेखोराने हल्ल्यापूर्वी पोलिश भाषेत तरुणाला उद्देशून काही विधान केले आणि यानंतर त्याने तरुणाला बेदम मारहाण केली. तीक्ष्ण हत्यारांनी त्याच्यावर वार करण्यात आले.
 
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील याप्रकरणी पोलंडमधील भारतीय दुतावासाकडून अहवाल मागवला आहे.
 
वर्णभेदातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय तरुणाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.